राज्यात धान्याचा तुटवडा; तातडीने उपाययोजना गरजेची..!

मुंबई :

केंद्र सरकार सामान्य जनतेला 3 महिना पुरेल एवढा धान्य पुरवठा करणार आहे. यावेळी राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा उपलब्ध असल्याने जनतेने काळजी करू नये, अशी ग्वाही दिली जात होती. पण अचानकपणे राज्यातील अनेक भागांत धान्याचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, हा तुटवडा व्यापाऱ्यांनी केल्याचेही बोलले जात आहे. सरकार यावर लक्ष ठेऊन असून असे असल्यास संबंधितांना योग्य ती समज दिली जाणार असल्याचे समजते.

मुंबई, ठाणे, पुण्यासह विदर्भातील किरकोळ व्यापारी किं वा किराणा मालाच्या दुकानांमध्ये पुरेसे धान्य मिळत नसल्याचे अनुभव ग्राहकांना येऊ लागला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले असून डाळी, तेल भाज्यांचे भावसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत. टाळेबंदीमुळे बाजारात काम करणारे अनेक हमाल कामावर उपस्थित राहू शकत नसल्याने प्रमुख शहरांचा अन्नधान्याचा पुरवठा रोडावला आहे. कामगार नसल्यामुळे बाजारात माल उतरवण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती अन्नधान्य बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*