गर्दी टाळा, करोनाला पळवा..!

मुंबई :

लोक डाऊन झाल्यावर कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम दिसू लागला. तज्ञांनी सांगितल्या प्रमाणे की एक काळ असा येईल की संख्या इतकी वाढेल व मृत्यू इतके झटपट होतील की रुग्णालये कमी पडतील. तशीच अवस्था आज दिसत आहे. राज्यात बुधवारी एकाच दिवशी कोरोनाचा संसर्ग होऊन चार मृत्यू झाले आहेत. त्यात तीन मृत्यू मुंबईत झाले असून तिघांपैकी एकानेही परदेश प्रवास केलेला नव्हता म्हणजेच त्यांना कोरोना हा कोरोनाबधितांच्या संपर्कात आल्याने झाला होता. त्यामुळे आता सगळ्यांनी गर्दी टाळण्याची गरज आहे.

जेवढी जास्त गर्दी तेवढा कोरोनाचा धोका जास्त आहे. मुंबईत लोक गर्दी करतच आहेत त्यामुळे तिथला धोका कमी होण्याचा कुठलाही पर्याय दिसत नाही. त्यामुळे तेथील आकडा वाढण्याची शक्यता आहे. राज्यात ७०५ जण विविध रुग्णालयांमध्ये भरती झाले. ७१२६ पैकी ६४५६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर आतापर्यंत ४१ कोरोनाबाधित रुग्णांना प्रकृती सुधारल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २४ हजार ८१८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १८२८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*