पाच हजार जण कोरोना बाधीतांच्या संपर्कात : राजेश टोपे

मुंबई :

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. लोक एकमेकांना भेटत असल्याने कोरोनाला आळा घालने कठीण जात आहे. या कोरोनाबाधितांच्या सहवासात सुमारे पाच हजार जण आल्याची धक्कादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सध्या राज्यातील पाच हजार जणांना विलगीकरण केंद्रात भरती करण्यात करण्यात आले आहे. हे सर्व जण करोनाबाधीत रुग्णांच्या जवळून संपर्कात आले होते. तसेच हे पाच हजार लोक भरती करण्यापूर्वी इतर अनेकांच्या संपर्कात आले असल्याने आता हा आकडा काय असेल याचा अंदाज करणेही मुश्किल झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जनतेला सक्त ताकीद दिली आहे की ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. जनतेने घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं सुरूच ठेवले तर सद्यःस्थितीचा पुनर्विचार करून कठोर उपाय योजावे लागतील.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*