चला हवा येऊ द्या फेम बद्रिकेची भारुडातून जनजागृती

मुंबई :

कोरोनाशी सामना करण्यासाठी लोक विविध पध्दतीने जनजागृती करत आहेत. समाजसेवक, कलाकार हे वैविध्यपूर्ण पद्धतीने लोकांना खरा मेसेज देत आहेत. पोलीस गाणे गाऊन जनजागृती करत आहेत.’चला हवा येऊ द्या’ फेम कुशल बद्रिके (Kushal Badrike) याने आणि त्याच्या कुटूंबियांनी खारीचा वाटा उचलत या जनजागृतीत सहभाग घेतला आहे.

राज्यात संचारबंदी लागू होऊनही लोक सर्रासपणे रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहे. त्यामुळे अशा लोकांनाही भारूडाच्या माध्यमातून लोकांच्या अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 147 वर पोहचला आहे. हे चित्र भीतीदायक आणि चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान महाराष्ट्रात कोरोनामुक्त होणार्‍यांचेही प्रमाण पुढील काही दिवसांत वाढेल असा आशावाद राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

कुशल बद्रिकेच्या भारुडाची लिंक

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*