तर पोलिसांच्या कुटुंबाला 50 लाखांचे सानुग्रह अनुदान

मुंबई :

कोरोनाच्या भीतीने सगळे लोक घरात बसले असताना राज्यातील पोलीस दल अव्याहतपणे रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावत आहे. त्यांनाही संसर्ग होण्याची भीती आहे असे असतानाही जीवावर उदार होऊन काम करत आहेत. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

संसर्गजन्य असणाऱ्या ‘कोरोना विषाणूच्या विरोधी लढ्यात जीवाची फिकीर न बाळगता सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी विभागांना मार्च महिन्याचे उर्वरीत वेतन प्राधान्याने देण्यात यावे असाही निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी पुढे बोलताना दिली. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात होमगार्ज जवानांची अतिरिक्त मदत घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*