वैज्ञानिकांना मिळालं यश; लस तयार केल्याचा दावा..!

न्युयॉर्क :

कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर वाढतच चालला आहे. आतापर्यंत असंख्य मृत्यू जगभरात आणि प्रामुख्याने इटली व अमेरिकेत झाले आहेत. जगभरात कोरोनाच्या विषाणूला मात देणारी लस शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोविड -१९ मुळे होणाऱ्या विषाणूविरूद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करण्यात यश मिळवले आहे. सदर संशोधकांनी पहिल्यांदा ही टेस्ट उंदीरावर केली आता पुढील काही दिवसात मानवावर ही टेस्ट करण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली आहे. क्लिनिकल ट्रेलच्या पहिल्या फेरीसाठीफूड ऍण्ड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (FDA) यांनी परवानगी दिल्यावर मग संशोधक या लसीचा प्रयोग मानवावर करतील.

हे संशोधक पिट्सबर्गच्या स्कूल ऑफ मेडिसिन विद्यापीठातील आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ही लस घेतल्यावर 2 आठवड्यात कोरोना प्रभाव संपून जाईल. अमेरिकन संशोधकांनी या लसीला ‘पिटकोवॅक’ असे नाव दिले आहे. फ्लूप्रमाणेच व्हायरल प्रोटीनच्या लॅब-निर्मित तुकड्यांमधून ते प्रतिकार वाढवते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*