अहमदनगर जिल्ह्यात हायअलर्ट

अहमदनगर :

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. लोक गर्दी कमी करत नसल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे आणखी 6 करोनाबाधित आढळून आल्यानंतर नगर जिल्ह्यात हाय अलर्ट करण्यात आला आहे. नगर शहरासह जामखेड, संगमनेरमध्ये पोलीस बंदोबस्तासह प्रतिबंधात्मक आदेश कडक करण्यात आले आहेत.

जामखेड व संगमनेर मध्ये हे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात असलेल्या सर्वच लोकांना ताब्यात घेऊन त्यांची सुद्धा तपासणी करण्यात येणार आहे. सुमारे 3000 पोलीस बंदोबस्त जिल्ह्यात लावण्यात आलेला आहे. तर संगमनेर शहरात तीन दिवसांचा कर्फ्यू लावण्यात आला असून या तीन दिवसात बाहेर कोणीही आढळून आल्यास यांच्यावर कार्यवाही येईल असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

आज नगर शहरात 1 तुकडी, 1 तुकडी संगमनेरमध्ये व अजून एक तुकडी अशा एसआरपीच्या 3 तीन तुकड्या दाखल झाल्या आहेत. नगर शहरात बंदी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात 12 पथके तैनात करण्यात आली असून आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*