कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्व-चाचणी टूल

मुंबई :

आता लवकरात लवकर कोरोनाची तपासणी होऊन संसर्ग झाला की नाही ते तातडीने कळणार आहे. आता कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल बनवले आहे.

या किट च्या माध्यमातून तुम्ही स्वतः प्राथमिक पातळीवर स्वतःला कोरोनाचा संसर्ग आहे की नाही ते तपासू शकता. प्राथमिक पातळीवर कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा उपयोग होणार असल्याची माहिती देत असताना हे टूल सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहे. हे टूल सर्वांसाठी https://covid-१९.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून वैद्यकीय सल्ला हवा असेल तर आवश्यक ती माहिती आणि संपर्क क्रमांकही या लिंकवर आहे.
हे स्व-चाचणी टूल मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. कोविड -१९ चा प्रभावीपणे सामना करण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमता वाढवणे, महत्वपूर्ण माहिती एकत्र करणे तसेच योग्य जनजागृती करून विद्यमान संसर्गाचे अधिक चांगले व्यवस्थापन करणे हा मुख्य हेतू आहे. प्रशासनाने उचललेले हे मोठे पाऊल असून याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*