आवश्यक तितकी वीज चालू ठेवून मेणबत्ती, दिवे लावा; ऊर्जामंत्र्यांचं आवाहन

मुंबई :

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आवाहननुसार घरातील सर्व लाईट बंद करून 9 मिनिटांकरिता फक्त दिवे लावावेत. पण जर भारतभरात एकच वेळी अनेक लोकांनी लाईट बंद केल्यास संपूर्ण देश आठवड्याभरासाठी अंधारात जाऊ शकतो.

याचा लोड पॉवर ग्रीड वर पडून मोठे नुकसान होऊ शकते हा संभाव्य धोका लक्षात घेऊन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जनतेला आवाहन केले आहे की आपल्या राज्यात, महानिर्मिती, महापारेषण, महावितरण व महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र या सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच जनतेनेही आवश्यक तितकेच लाईट चालू ठेऊन, दिवे, मेणबत्ती इ. लावावेत.

लॉकडाऊनमुळे आधीच विजेची मागणी घटल्यामुळे वीज उत्पादन आणि पुरवठ्याचे गणित बदलले आहे. जर सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केल्यास अजून परिस्थिती बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असेही पुढे बोलताना त्यांनी सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*