३ महिन्यांसाठी मोफत गॅस सिलिंडर..!

पुणे :

कोरोनाच्या विषाणू सोबत लढण्यासाठी लॉक डाऊन केलेला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र रेशन दुकानांमध्ये अन्नधान्य मोफत वाटण्याच्या व सलग तीन महिन्यांच्या धान्य एकदाच देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. आता असाच एक दिलासादायक निर्णय पुन्हा घेतला आहे. लॉकडाऊन परिस्थितीत गरीब मजूर आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस (पीएमयुवाय) योजनेअंतर्गत तीन महिन्यांसाठी मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या भारत पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला आहे.

सद्यस्थितीत एक लाख 40 हजार लोकांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. तसेच या निर्णयाचा लाभ प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील ग्राहकांना मिळणार आहे.
एप्रिल महिन्यात सिलिंडर खर्चाची रक्कम उज्वला गॅस लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होईल. त्यानंतर ग्राहकाला सिलिंडर खरेदी करता येईल. पीएमयुवाय ग्राहकाला दर महिन्याला एक सिलिंडर मिळणार आहे. शेवटचा सिलिंडर मिळाल्यानंतर 15 दिवसानंतर लाभार्थी ग्राहकाला पुढील सिलिंडर बुक करता येईल. सिलिंडर रिफीलसाठी बुकिंग नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाद्वारे करणे आवश्यक आहे. @चित्रा नायर ( नोडल ऑफिसर,हिंदुस्तान पेट्रोलियम)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*