वारंवार Sex केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते का; वाचा सविस्तर

सेक्स हा प्रत्येकाच्या आयुष्याचा खाजगी भाग आहे. बऱ्याचदा सेक्सचे फायदे तोटे याविषयी अनेकांना गैरसमज असतात. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती किती महत्वाची हे लोकांच्या लक्षात येत आहे. वारंवार सेक्स केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र याचे नीट उत्तर अजूनपर्यंत कोणाला मिळालेले नाही.

जर्मनीच्या वैद्यकिय विभागाने हस्तमैथुन करण्याचा फायदा तुमच्या शरीरावर होतो. तर न्युयॉर्कच्या तज्ज्ञानुसार यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढतेच असे नाही. पण यामुळे तुम्हाला इन्फेक्शन विरुद्ध लढण्यास मदत होते. यात एक तिसरे मत मांडले जाते ते म्हणजे शारीरिक क्रियेचा संबंध असल्यामुळे सेक्सचा नक्कीच तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो असे तज्ज्ञांचे मत आहे.

जर्मनीतील तज्ज्ञांनुसार, चांगले सेक्स करणे हे नेहमीच शरीरासाठी आरोग्यदायी आहे. यात शरीरासाठी हालचाल होत असल्या कारणाने तुमचे हाडे, मसल्स मजबूत होतात. ज्यामुळे तुम्हाला पाठदुखी, कंबरदुखी यांसारख्या समस्या उद्भवत नाही.तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ, फळे खा, तुमचे हात स्वच्छ धुवा, रोज व्यायाम करा आणि हो त्यासोबत सेक्सही करा ज्यात एक वेगळीच मजा आणि एका वेगळा अनुभव मिळतो.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*