त्या ‘टी’वाल्याची पुणे पोलिसांनी घेतली ‘सेफ’टी..!

पुणे :

ट्विटरवर चहासाठी दुध आणण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती एकाने पुणे पुणे पोलिसांना केली. त्यावर त्यांनीही पुणेरी स्टाईलने भन्नाट उत्तर दिले आहे. हा विषय सध्या जोरात ट्रेंडमध्ये आहे.

तर किस्सा असाय की कोरोनामुळे सगळेच घरात बसून आहेत. मेडिकल इमर्जन्सी सोडता कुणाला बाहेर पडू देईनात. त्यात पुण्यात जास्त रुग्ण असल्याने पुणेकरांकडे वातावरण जास्त टाईट आहे. पुणेकर म्हणजे सवयीचे पक्के, दुपारी 1 ते 4 झोपले नाही तर पुन्हा रात्रभर झोप येणार नाही अशी परिस्थिती. सारं जग भयंकराच्या दारात उभं असताना सुदर्शन चव्हाण या पुणेकराला चहा प्यायची तल्लफ होते आणि तो थेट पुणे पोलिसांना ट्विटरवर विचारतो की, ‘दुधाचा ‘टी’ (चहा) पिण्याची प्रचंड तलप झाली असल्याने डेअरीमधून दूध आण्याची परवानगी मिळेल काय?’

पोलिसही दिवसभर त्रासलेले आहेत. जीवावर उदार होऊ ड्युटी करत आहेत. पण पोलीस असले म्हणून काय झाले शेवटी तेही पुणेकरच आहेत. यावर पुणे पोलिसांनी, ‘आम्ही समजू शकतो की तुम्हाला ‘टी’ नसल्याने डिफिकल-‘टी’ होत आहे. मात्र तुमची सेफ-‘टी’ देखील तितकीच महत्वाची आहे.’ तसेच पुणे पोलिसांनी ह्या पुणेकर महोदयांना चक्क लॉक डाऊन संपल्यावर भेटा, चहा पाजतो अशी भन्नाट ऑफर दिली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*