‘साहेब मारू नका, रानात आई बाप उपाशी आहे’..!

पुणे :

कोरोनामुळे लोकांना घराबाहेर पडायला बंदी आहे. पण गाव – खेड्यांमध्ये शेती कसण्याशिवाय पर्याय नसल्याने लोक शेतात जातच आहेत. गावकडेही पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र तरीही शहर व गाव ठिकाणी पोलीस कुठलीही विचारपूस न करता नागरिकांना नाहक मारहाण करत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

एक मुलगा व त्याचा मित्र आई बापाला डबा घेऊन रानात चालले असताना त्यांना पकडून मारहाण केली. तसेच त्याच्या कानाखाली सुध्दा मारली. साहेब, आई बापाला डबा घेऊन रानात चाललोय, ते तिकडे उपाशी आहेत. मारू नका साहेब असे म्हणत असताना त्याला मारहाण चालू होती. कितीतरी वेळा माफी मागूनही त्याला मारण्यात आले.

सदर व्हिडिओ शुक्रवारी काढलेला आहे. मंचर मधील गावडेवाडी या गावामध्ये एक तरुण व त्याचा मित्र एका गाडीवर त्याच्या वृद्ध आई – वडिलांना जेवणाचा डबा घेऊन निघाले होते. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवून त्यांच्यावर काठीने प्रहार केले. मानेवर देखील जोरदार प्रहार केले. माफी मागितली तरी त्याला अमानुष मारहाण करत राहिले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*