9 मिनिटाच्या अंधाराचा फायदा घेत केली..!

भिवंडी :

भिवंडीतील पोलीस पाटलांनी कोरोना हा संसर्गजन्य रोग आल्यापासून दारू बंदी केली होती. हाच राग काही युवकांच्या मनात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार काल देशभरात 9 वाजता अनेक लोकांनी लाईट बंद ठेवल्या होत्या आणि दिवे लावले होते. त्याचाच फायदा घेत ही दगडफेक करण्यात आली. फक्त 9 मिनिटांचा फायदा घेत भुरट्या लोकांनी दगडफेक करत दिवे लावले. यात घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कुणालाही जखम झाली नसून फक्त घराचे नुकसान झाले आहे.

हे युवक कोण होते अद्याप लक्षात आले नसले तरी ते आसपासच्या परिसरातील असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काल लाईट बंद करताना लोकांनी दिवे लावण्यासोबत फटाकेही वाजवले. त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एके ठिकाणी म्हशीला भाजले तसेच एक तरुणाचे तोंड भाजले असल्याची माहिती मिळाली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*