धक्कादायक; एकाच दिवशी सापडले सात रुग्ण, एकाचा मृत्यू

औरंगाबाद :

औरंगाबादमध्ये आतापर्यंत एकही रुग्ण नसल्याने कुठलेही भीतीदायक वातावरण नव्हते. रविवारी सकाळी 2 जनांचे अहवाल कोरोना पॉजीटीव्ह आले. त्यानंतर लगेचच एक वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली. एवढे होते न होते तोच संध्याकाळ पर्यंत 7 जनांचे अहवाल निगेटिव्ह आले.

यामध्ये एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरसह सात वर्षीय मुलीचाही समावेश आहे. सदर रुग्ण ज्या भागात सापडले आहेत ते सगळे रस्ते, कॉलनी परिसर सील केले आहेत. औरंगाबाद मध्ये सध्या भयावह परिस्थिती असून शिथिल असलेले वातावरण कडक करण्यात आलेले आहे. सगळे रुग्ण हे शहराच्या वेगवेगळ्या भागातील असून सगळ्यांना काळजी घेण्याची आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*