मुंढेनी दिला महापौरांच्या विरोधात निर्णय

नागपूर :

तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक नियमांसाठी प्रसिद्ध आहेत. नागपूर येथे कॉटन मार्केट बंद करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले होते. त्यांनतर महापौर संदीप जोशी यांनी येथील व्यापाऱ्यांसोबत चर्चेनंतर उपायुक्त महेश मोरोणे यांना कॉटन मार्केट सुरू करण्याचे निर्देश दिले. यानंतर फवारणी व स्वच्छता यावर महापौरांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यात तुकाराम मुंढे हे अचानकपणे उपस्थित झाले. व कॉटन मार्केट बंद राहील असा निर्णय महापौर संदीप जोशी व इतर अधिकारी, कर्मचारी वर्गासमोर दिला.

याच बैठकीत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनीसुध्दा कॉटन मार्केट सुरू करण्याचा विचार मांडला होता. परंतु या सगळ्यांना न जुमानता बंद म्हणजे बंद असा निर्णय देऊन मुंढे मोकळे झाले. यावेळी महापौर व आयुक्त यांच्यात निर्णय घेताना कुठलीही चर्चा होत नाही असे दिसून आले कारण दोघांनीही वेगवेगळे निर्णय दिले होते. त्यांच्यात सख्य नसल्याच्या चर्चानाही यावेळी उधाण आले.

महापौर संदीप जोशी यांनी सुचविल्या होत्या या गोष्टी :
1. कॉटन मार्केटमध्ये येणाऱ्या वाहनांची संख्या 50 किंवा 100 ठेवा.
2. टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये वाहने सोडा.
3. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पाळावयाचे सर्व नियम पाळण्याची ताकीद देऊन तातडीने कॉटन मार्केट सुरू करा.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*