81 वर्षांच्या आजीबाई घालताहेत लंगडी..!

मुंबई :

जुनी लोक जबरदस्त खायची, तगडा व्यायाम करायची आणि फिट राहायची. त्याचाच नमुना आत आपल्याला दिसत आहे. तब्बल 81 वर्षांच्या आजीबाई या व्हिडीओत लंगडी खेळताना दिसत आहे. 28 वर्षांच्या सूनबाईसोबत ह्या आजी लंगडी घालत आहेत. फिट अभिनेता मिलिंद सोमण याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमन त्याचा उत्तम अभिनय, मॉडेलिंग आणि त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो.

त्याने शेअर केलेल्या या व्हिडीओत 81 वर्षीय आजीबाई दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून त्याच्या आई आहेत. त्याच्या आईचा हा व्हिडीओ शेअर करत 28 असो 81 कुठल्याही वयात फिट राहा असा सल्ला त्याने चाहत्यांना दिला आहे. या दोघींमध्येही लंगडी या खेळाची स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेसाठी दोघीही आपल्या पुरेपुर एनर्जीचा वापर करत आहेत. या दोघीही लंगडी स्पर्धेत गुंतलेल्या आतांना मिलिंद याने हा व्हिडीओ शूट करून स्वतःच्या इन्स्टाग्राम ला टाकला आहे.
व्हिडीओची लिंक –

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*