नगरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले, काळजी घेण्याची नितांत गरज

अहमदनगर :

नगरमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जात आहे. रोज एक नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडत आहे. आज सकाळी पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविण्यात आलेल्या 73 स्राव चाचणी नमुन्यापैकी 39 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहे. यावेळी 38 व्यक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत परंतु 1 जणाचा रीपोर्ट पोसिटीव्ह आला आहे. सदर युवक 31 वर्षीय असून तो शहराजवळील नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील आलमगीर येथील रहिवासी आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरुंबिकर यांनी दिली.

सध्या नगरमध्ये 21 लोक कोरोनाग्रस्त असून नव्याने आलेल्या पोलीस जिल्हाध्यक्ष यांनी सगळीकडे कडक कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. लोक गांभीर्याने घेत नसल्याने आता त्यांनी लोकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*