ड्रोन फिरत होता शहरावर आणि गच्चीवर दिसले आश्चर्यकारक दृश्य

सुरत :

गच्ची म्हणजे सगळ्यांचाच पर्सनल स्पेस असतो पण कोरोनामुळे सोशल डिस्टनसिंग पाळणे गरजेचे आहे. कोरोनाच्या भीतीमुळे सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले आहे. तरीही लोक जिथे गर्दी करताना दिसताहेत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस ड्रोनचा वापर करत आहेत. या दरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सुरत मधील एका गच्चीवर लोकांनी चक्क भजे पार्टी ठेवली होती.

जेव्हा ड्रोन दिसला तेव्हा सगळे खाली पळून जाऊ लागले. लोकांना एकत्र जमण्यास मनाई आहे. तरीही लॉक डाऊन चा उपयोग पार्टी करण्यासाठी चालू आहे असे दिसून आले.
लॉकडाऊनमध्ये नियम कठोर असतानाही लोकांना मात्र कुठलेही गांभीर्य दिसत नाही. त्यामुळे कलम 144 चे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य रोगाला लोक सहज घेत असल्याने पोलिसांनी गंभीर पावलं उचलली आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*