पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

पुणे :

कोरोनाचे सावट अजूनही कमी होत नसल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या काही परीक्षा रद्द होणार अशा अफवा पसरल्या होत्या. यावर पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांनी स्पष्टीकरण दिले की सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. मात्र कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही.

कोरोनामुळे सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली गेली आहे. काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू होत्या. त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच कला, वाणिज्य, व विज्ञान शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करणार व कुठलीही परीक्षा घेणार नाहीत अशा अफवा चालू झाल्या होत्या. लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना लॉकडाऊननंतर परीक्षेला सामोरे जावेच लागणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*