स्टॅच्यू ऑफ युनिटी काढला विक्रीला, किंमत ३०,००० कोटी..!

सुरत :

एखादा चोरांचा पण महाचोर असतो. अट्टल चोर नटवरलाल तर सगळ्यांचा माहिती आहे हो तोच तो ज्याने परदेशी पर्यटकांना ताजमहाल तीनदा, लाल किल्ला दोनदा, राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि ५४५ खासदारांना विकले होते. तसाच एक चोर आता समोर आला आहे आणि त्याने चक्क भारताचा महत्वाचा प्रोजेक्ट “स्टॅच्यू ऑफ युनिटी” विक्रीस काढला आहे. विशेष म्हणजे त्यावर 30000 कोटी रुपये किंमतही लावली आहे. हे चोर महाशय गुजरातमधीलच असून त्यांनी olx वर हा पुतळा विक्रीस ठेवला आहे.

‘सध्या देशात रूग्णालय आणि हेल्थकेअर इक्विपमेंट्ससाठी पैशांची गरज असल्याने ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विकण्याची वेळ आली आहे.’ अशा पद्धतीने जाहिरात करून या डोकेबाज माणसाने सगळ्यांचे डोके फिरवले आहे. Olx कंपनीच्या हे लक्षात येताच त्यांनी ही जाहिरात तात्काळ काढून टाकली. सोशल मीडियावर ही गोष्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*