BSNLची नवी ऑफर, या प्लानमध्ये ५०० GB डेटा मिळणार

दिल्ली :

खाजगी कंपन्या ग्राहकांना बांधून ठेवण्यासाठी नवनवीन ऑफर देत आहेत. लॉक डाऊन मुळे सगळे बोर झाले असताना ग्राहकांची काळजी घेण्याची प्रयत्न मोबाईल व सिम कार्ड कंपन्याकडून केला जात आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी दोन तगड्या ऑफर आणल्या आहेत. पहिली ऑफर ही ६९३ रुपयांची आहे तर दुसऱ्या ऑफर मध्ये १२१२ रुपयांचा प्लान आणला आहे.

या दोन्ही प्लानमध्ये ३६५ दिवसांच्या वैधतेसह ५०० जीबी पर्यंत डेटा ऑफर दिला जात आहे. बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना स्पेशल टॅरिफ व्हाऊचर अंतर्गत जास्त डेटा ऑफर केली आहे. त्यामुळे आता बीएसएनएलला ग्राहकांना जोडून ठेवण्यात यश येणार आहे. अजूनपर्यंत संपूर्ण भारतात हा प्लॅन लागू झाला नसला तरी आंध्र प्रदेश आणि तेलंगाना या राज्यात हे प्लॅन्स सुरू केले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*