तरीही आता व्हिडिओ-व्हॉईस कॉल करता येणार, जिओची खास ऑफर

दिल्ली :

देशात सर्वत्र लॉक डाऊन आहे. सध्या लोक व्हिडीओ कॉल करण्यावर भर देत आहेत. पण काही जणांच्या घरी नेटवर्क मिळत नसल्याने ते भलतंच बोर झालेले आहेत. पण काळजी करू नका तुमच्याकडे जिओ असेल तर आता तुम्ही व्हिडीओ आणि व्हॉइस कॉल नेटवर्क नसतानाही करू शकता. रिलायन्स जिओने आपल्या युजर्संसाठी एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने विना टेलिकॉम नेटवर्क मध्येही तुम्ही कोणालाही कॉल करू शकाल. या फीचरने नाव वाय फाय कॉलिंग सर्विस (Jio WiFi calling service) आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही

नेटवर्कमध्ये नसले तरी तुम्हाला व्हिडिओ आणि व्हॉईस कॉल करता येणार आहे.
लॉक डाऊनच्या काळात आपल्या ग्राहकांसाठी ही मनमोहक ऑफर जिओ ने दिली आहे. जिओ या काळात आपल्या ग्राहकांची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतीच जिओने १००० मिनिट्स फ्री आणि १०० एसएमएस सह १७ एप्रिल पर्यंत वैधता वाढवण्याची घोषणा केली होती. जिओ युजर्संना कोणतीही अडचण येवू नये, यासाठी कंपनी वेगवेगळे प्लान लाँच करीत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*