बॉलिवूडचा शेरदिल दबंग खान घाबरला; मग आपली काय तऱ्हा..!

नवेल :

सध्या लॉकडाउनमुळे संपूर्ण देश सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे.बेधडक आणि निडर अशी ओळख असणारा सलमान खानसुद्धा घाबरला आहे. सलमान खान सध्या पनवेलच्या फार्महाऊसवर आहे. तिथे त्याचा पुतण्या निर्वाण म्हणजे सोहेल खानचा मुलगा सुध्दा आहे. सलमानने रविवारी रात्री १.०० वाजता इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. सलमान या व्हिडिओत सांगतो की, गेल्या तीन आठवड्यांपासून तो कुटुंबापासून लांब आहे आणि घाबरला आहे. सलमान म्हणाला की, ‘ हो आम्ही घाबरलो आहोत.’

कोरोनामुळे अगदी सुपरस्टार सुध्दा घरात बसून आहेत. व्हिडीओ मध्ये पुढे बोलताना सलमान निर्वाणला एक प्रश्न विचारतो की, जो डर गया समझो मर गया हा डायलॉग माहीत आहे का हा डायलॉग ऐकला आहे का? प्रत्युत्तर देत निर्वाण हो म्हणतो. यानंतर सलमान म्हणतो की, ‘पण हा डायलॉग इथे चालत नाही. आम्ही घाबरलो आहोत आणि मोठ्या हिंम्मतीने आम्ही हे मान्य करत आहोत.’ एवढंच नाही तर निर्वानला या सगळ्याबद्दल काय वाटतं असं सलमान विचारतो. यावर निर्वानने सर्वांनी आपल्या घरात रहावं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवावं. कारण तेव्हाच या सर्व गोष्टी लवकर संपतील असं उत्तर दिलं.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*