वरच्या खिडकीत तो, खालच्या खिडकीत ती; पुढे जे झालं ते पाहा..!

लॉक डाऊन दरम्यान अनेक बऱ्या वाईट घटना कॅमेऱ्यात कैद होत आहेत. लॉक डाऊन मुळे घराच्या बाहेर पडता येत नसल्यामुळे एक पठ्ठ्याने ड्रोनच्या माध्यमातून मुलीला प्रपोज केल्याची घटना नुकतीच समोर आली. तसेच आता अजून एका जोडीची स्टोरी व्हायरल होत आहे.
आपल्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना एक मुलगी खिडकीत येऊन धन्यवाद देत होती.

त्यांनतर बरोबर तिच्या वरील फ्लॅट मध्ये राहणाऱ्या एका मुलाने हे पहिले व तिला घरातून वाईन ग्लास आणायला लावला. मग तो स्वतः वरच्या खिडकीतून वाईन बॉटल मधून खालच्या खिडकीत असनाऱ्या मुलीच्या ग्लासमध्ये वाईन ओतत होता. दरम्यान समोरच्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या दुसऱ्या युवकाने याचे चित्रण केले. आता ही लव स्टोरी सुध्दा गाजत आहे. हा व्हिडीओ एक मिलीयन लोकांनी पहिला असून, व्हिडीओला 62 हजार पेक्षा अधिक लाईक्स आहेत.

व्हिडीओची लिंक –

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*