जगातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह प्राणी आढळला; प्राणीसंग्रहालयातील वाघिणीला संसर्ग

न्युयॉर्क :

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. मृत्यूचा आलेखही चढता आहे. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अमेरिकेत जगभरातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह प्राणी अमेरिकेत आढळला आहे. न्यूयॉर्क येथील एका वाघिणीला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे, मानसांसह आता प्राण्यांमध्येही कोरोनाच धोका निर्माण झाला आहे.

महासत्ता म्हणवली जाणारी अमेरिका या रोगापुढे हतबल झाली आहे. एकवेळ माणसांना झालेला कोरोना लवकर लक्षात येईल पण प्राण्यांचे काय? आता प्राण्यांकडे लक्ष देणार की माणसाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, आतापर्यंत ११ लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ६३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत १५ हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकतही कोरोनामुळे ३ लाखांहून अधिक जणांचा कोरोनाची बाधा झाली आहे. तर, आतापर्यंत ७ हजार,९०० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*