औरंगाबादेत आणखी तीन कोरोना पाॅझिटीव्ह

औरंगाबाद :

शहरात एकही कोरोनाचा रुग्ण नाही असे म्हणता म्हणता परवा अचानकपणे एकाच दिवसात सात रुग्ण सापडले. त्यांनतर एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला होता. शहरात आखणी तिघांना कोरोनाची बाधा झाली असून कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. हा अजून एक धक्का औरंगाबादकरांना बसला आहे. या कोरोना बाधितांमध्ये २ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हे तिघेही यापूर्वीच्या बाधित रुग्णांच्या कुटुंबीतील सदस्य आहेत.

आता औरंगाबाद जिल्ह्यातील आकडा १४ झाला आहे. यामध्ये १४ पैकी १२ जणांवर सध्या उपचार सुरू असून एक रुग्ण बरा झाला तर एकाचा मृत्यु झालेला आहे.
आता मात्र औरंगाबाद मध्ये काळजीचे व भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. सगळं जग कोरोनाच्या विळख्यात असताना निर्धास्त असणारा औरंगाबादकर आता धास्तावलेला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*