‘लैक्मे’वरही घसरले बाबा रामदेव; पहा काय म्हणणे आहे त्यांचे…

मुंबई :

लॉकडाऊन परिस्थितीत ट्विटरवर जास्त सक्रीय झालेल्या स्वामी रामदेव बाबा यांनी परदेशी कंपन्यांना लक्ष्य करण्याचा नवा उद्योग सुरू केला आहे. डेटॉल आणि कोलगेट यांच्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा हिंदुस्तान युनिलिव्हर या आघाडीच्या कंपनीकडे वळविला आहे. त्यांनी या कंपनीवर हिंदुस्तानी नसल्याची टीका करतानाच नफेखोरीचा आरोप केला आहे.

कोरफड जेलचे दोन फोटो त्यांनी ट्विट केले आहेत. पहिला आहे पतंजली सौंदर्या याचा तर दुसरा लैक्मे अलो अक्वा जेल याचा. त्यावर त्यांनी लिहिले आहे की, पतंजली एलोविरा जेल ४५ रुपयात ६० मिली मिळते. तर, लैक्मे यांचा एलोविरा जेल २०० रुपयांमध्ये फ़क़्त ५० ग्राम मिळतो. म्हणजेच लैक्मेचे प्रोडक्ट्स थेट ४३३ टक्के महाग आहेत. लैक्मे हा हिंदुस्तान युनिलिव्हर यांचा ब्रांड आहे. त्यांच्या फ़क़्त नावात हिंदुस्तान आहे. मनात मात्र नाही..

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*