सोनिया गांधींनी उपस्थित केले मुद्दे; भाजपचा झाला तिळपापड..!

दिल्ली :

देशातील करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटासह धार्मिक विसंवाद निर्माण करण्याच्या मुद्यावर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर केंद्र सरकारतर्फे ठोस प्रत्युत्तर अजूनही आलेले नाही. मात्र, त्याचवेळी भाजपच्या अनेक नेते व कार्यकर्ते यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

कॉंग्रेस वर्किंग कमिटीने अधिकृत पत्र काढून आपली भूमिका जाहीर केली आहे. तसेच सोनिया गांधी यांनी व्हिडिओद्वारे आपली भूमिका मांडली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, देशात करोना विषाणूच्या खूप कमी चाचण्या होत आहेत. तसेच या संकटाच्या काळात रुग्णांना वाचविण्यासह देशाची आरोग्य व्यवस्था सुस्थितीत राखण्यासाठी झटणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेस यांना दर्जेदार संरक्षण साहित्य देण्यात सरकार कमी पडत आहे. यासह शेतकरी, कष्टकरी आणि देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था यावर कॉंग्रेसने चिंता व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठोस कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.

त्यावर आतापर्यत केंद्र सरकारने कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. तर, भाजपचे नेते शहनवाज हुसेन यांनी म्हटले आहे की, देशामध्ये करोनासारखे मोठे संकट असताना उगीचच कोणत्याही मुद्यांवर विरोधी पक्षाने राजकारण करू नये. काहीजण धार्मिक असंतोष पसरवून आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेत आहेत. देशात शांतता आहे आणि देश एकोप्याने करोनाच्या संकटाशी लढत आहे. यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत खात्यावर जाऊन ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*