राज्यपालांना निर्णय घ्यावाच लागेल : छगन भुजबळ

नाशिक :

सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून वाद चालू आहे. एका बाजूला कोरोनाचे संकट आहे तर दुसर्या बाजूला हा वाद आहे. भाजपनेही मंत्रिमंडळ निर्णयाला आक्षेप घेत, उद्धव ठाकरे हे राज्यपाल नियुक्त आमदार होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे. या वादावर बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले कि उद्धव ठाकरे हे फोटोग्राफर, सामनाचे संपादक आणि एक कलाकार असल्याने त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्त करण्यास राज्यपालांना कोणतीही अडचण नाही. त्यांना निर्णय घ्यावाच लागेल.

यावेळी ते नाशिकमध्ये आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की राज्यपाल अशा पद्धतीने कोणाची अडवणूक करू शकत नाहीत. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या सगळ्या नियमात उद्धव ठाकरे बसत आहेत. करोनाच्या संकटात सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फोटोग्राफर, सामनाचे संपादक आणि एक कलाकार आहेत. राज्यपालांच्या कोट्यातून कलाकार, पत्रकार अशा लोकांना नियुक्त करता येत असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याबाबतचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे पाठवला गेला आहे. मात्र, राज्यपालांनी अजूनही त्यावर अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*