‘MNC वर बहिष्कार घाला’; रामदेव बाबा यांनी सुरु केले विशेष अभियान..!

मुंबई :

एकीकडे अवघा देश फेसबुक या अमेरिकन कंपनीच्या रिलायन्स कंपनीत हजारो कोटींच्या गुंतवणुकीचे गोडवे गात असतानाच आता स्वामी रामदेव बाबा यांनी मल्टी नॅशनल कंपन्यांच्या विरोधातील आवाज मोठा केला आहे. त्यांनी मागील आठवड्यापासून MNC कंपन्यांना लक्ष्य करून त्यांनी देशातील ग्राहकांची लूट थांबविण्याचे आवाहन केले आहे.

Dettol, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोलगेट यासह सर्वच कंपन्यांची विविध उत्पादने आणि त्यांच्या पतंजली कंपनीच्या उत्पादनामधील भावांतर (रेटमधील बदल) अधोरेखित करणाऱ्या इमेजेस आणि माहिती ट्विट करण्यास सुरुवात केली आहे. आताही त्यांनी कोरफड ज्यूसमधून ग्राहकांना फॉरएवर Forever लुटत असल्याचा आरोप करणारे ट्विट केले आहे. एकूणच पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा देत आपल्या पतंजली कंपनीचे बस्तान पक्के करण्यासाठीची खेळी रामदेव बाबा खेळत असल्याचे चित्र आहे. ‘MNC वर बहिष्कार घाला’ हे अभियान त्यांनी यातूनच सुरू केले असल्याचे दिसते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*