होय, पुण्यात बनणार करोनाची लस; वाट पहावी लागणार ‘इतके’ महिने..!

पुणे :

उद्योजक सायरस पूनावाला यांचे सुपूत्र आदर पूनावाला यांची सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही कंपनी सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठासोबतच्या प्रकल्पात सहभागी आहे. या कंपनीच्या मांजरी (पुणे) येथील प्रकल्पात ही लस बनवण्याचे नियोजन आहे. मात्र, एकूण या लसच्या चाचण्या आणि अनुमान येऊन खऱ्या अर्थाने मास स्केलवर उत्पादन होण्यासाठी आणखी किमान सहा महिने तरी वाट पहावी लागणार आहे.

सीईओ आदर पूनावाला यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, Covid-19 विरोधात बनवण्यात येणाऱ्या लसीची किंमत १ हजार रुपयांपर्यंत असू शकते. चाचण्या यशस्वी झाल्या तर सप्टेंबर-ऑक्टोंबर पर्यंत ही लस बाजारात उपलब्ध होईल. टाइम्स ऑफ इंडिया या आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने ही बातमी दिली आहे.

लसीमधून पैसा कमावण्याची ही वेळ नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लस पोहोचवणे, त्यांना ही लस उपलब्ध करुन देणे ही वेळेची गरज आहे, असेही पूनावाला यांनी म्हटलेले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*