खुशखबर | ४ नाही फ़क़्त एका आठवड्यात होईल बर्फानी बाबाचे दर्शन..!

दिल्ली :

कैलास मानसरोवर आणि कैलास पर्वत आठवला आणि उच्चार ऐकला तरी आपल्याला आठवतात बाबा बर्फानी.. होय तेच आपले भगवान शिव.. मात्र, कैलास यात्रा करणे म्हणजे मोठे आव्हान. चार आठवड्यांच्या या प्रवासातील धोके आणि अडथळे आता कमी झालेले आहेत. कारण, आपण ही यात्रा आता फ़क़्त एकाच आठवड्यात पूर्ण करू शकणार आहोत.

गर्बाधार- लिपुलेख यादरम्यान सुमारे ८० किलोमीटर लांबीचा रस्ता तयार झालेला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या रस्त्याचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने केले आहे. मागील १२ वर्षे या रस्त्याचे काम चालू होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २००५ मध्ये या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर त्याचे सर्वेक्षण आणि कामाला सुरुवात होण्यासाठी २००८ हे वर्ष उजाडले. मात्र, हिमालय पर्वतामधून १७ हजार फुट उंचीवर मार्ग काढत हा रस्ता करणे म्हणजे मोठे आव्हान होते. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला सुमारे १२ वर्षे लागली आहेत. कॉंग्रेस सरकारने सुरू केलेल्या या रस्त्याचे काम अखेर भाजप सरकारच्या काळात पूर्ण झाले आहे. त्यामुळे कैलास यात्रा करण्यासह चीनबरोबरच्या संरक्षण कार्यावाहीतही हा रस्ता मोठा महत्वाचा ठरणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*