‘त्या’ कोरोनाच्या रुग्णांना करोना चाचणी न करताच घरी जाऊ देणार..!

दिल्ली :

कोरोना मधून बऱ्या झालेल्या रुग्णांसंदर्भात केंद्रीय मंत्रालयाने काल सुधारित दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यांना घरी सोडण्याबाबत हे निर्देश असून त्यात म्हटले आहे कि, करोना विषाणू संसर्गाची तीव्र लक्षणे आढळलेल्या आणि रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम झालेल्या रुग्णांचा आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल नकारात्मक मिळाला तरच त्यांना रुग्णालयातून सुटी देता येईल.

तसेच ज्यांच्यात लक्षणे नसतील किंवा सौम्य, अति सौम्य असतील त्यांची लक्षणं दिसेनाशी झाली कि मग त्यांची आरटी-पीसीआर चाचणी नाही केली तरी चालेल त्यांना तसेच घरी सोडण्याचे सांगितले आहे.

आता कोरोनाच्या रुग्णांचे वर्गीकरण केले जाईल. मग त्याच्या वर्गीकरणानुसार त्या कोरोनाच्या रुग्णाला वैद्यकीय सुविधा दिली जाईल. सुधारित दिशानिर्देशांनुसार सौम्य लक्षणे दाखवणाऱ्या रुग्णांना 3 दिवसात ताप उतरला आणि 95 % श्वासोच्छ्वास नियमित राहिला तर 10 दिवसात घरी सोडले जाईल. त्यासाठी वेगळ्या चाचणीची गरज नाही. यापूर्वी कोरोनाचा संसर्ग लक्षात आला कि पहिली 14 दिवसांनी चाचणी व्हायची आणि दुसरी 24 दिवसांनी होत असे. या दोन्ही चाचणी नकारात्मक आली तरच रुग्णाला डिस्चार्ज मिळत होता.

आरोग्य मंत्रालयाच्या परिपत्रकात पुढे असे म्हटले आहे कि घरी सोडलेल्या रुग्णांना 7 दिवस घरीच विलग रहावे लागेल, तसेच दर 14 दिवसांनी दूरध्वनीवरुन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली जाईल. त्यांना पुन्हा ताप किंवा इतर लक्षणे दिसली तर 1075 या क्रमांकावर संपर्क करायचा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*