खासदार संबित यांनी दाखवली ‘पात्रा’ता; ‘हा’ आरोप केल्याने झाले ट्रोल..!

मुंबई :

भाजपचे खासदार आणि महातोंडाळ प्रवक्ते म्हणून संबित पात्रा यांची जागतिक ओळख पक्की झालेली आहे. कॉंग्रेस असो की कोणीही विरोधक, त्यांच्यावर जोरात तुटून पडणारे आणि चमत्कारिक आणि प्रसंगी काल्पनिक आरोप करण्यात त्यांचा हातखंडा आहे. याच पात्रा यांनी आता कॉंग्रेस राज्य जर असते तर करोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत कोणते घोटाळे झाले असते याची मजेशीर इमेज प्रसिद्ध केली आहे.

त्यावरून त्यांना अनेकांनी समर्थन व्यक्त करतानाच बहुसंख्य मंडळींनी कडाडून टीका केली आहे. मात्र, टीकेला बधतील ते संबित पात्रा कसे असतील. त्यांनीही हे ट्विट अजिबात डिलीट केलेले नाही. तसेच त्यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांनी त्याला रिट्विट करून जोरदारपणे या काल्पनिक आरोपांना फैलावले आहे. त्यावरून महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पात्रा यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पात्रा हे डॉक्टर असून ते ज्याचे ऑपरेशन करायचे. तीच गोष्ट त्यांच्या तोंडून बाहेर पडली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*