नगरमध्ये मुख्यमंत्र्यांचा प्लॉट; भाऊ मुख्यमंत्री गुंतवणूक करतेत, भाव तर वाढलाच पाहिजे ना…

नगरकडे उद्योगधंदे पाठ फिरवत आहेत. गेल्या कित्येक वर्षात मोठ्या कंपन्याही नगरमध्ये गुंतवणूक करायला नको म्हणत आहेत नगरमधील तरुणही पुणे मुंबई अशा ठिकाणी जॉब शोधण्यासाठी जात आहे. परिणामी येथील जमिनीचे रेट कमी आहेत.

एकदम मस्त पैलवान जसा आडवातिडवा वाढलेला असतो तसं नगर वाढलेला आहे. एकेकाळी नगरचे तुलना कैरो, सुरत यांसारख्या शहरांशी व्हायची. आणि मागच्या वीस वर्षात मागून येऊन नाशिक आणि औरंगाबाद सारखी शहरे विकसित झाली, पण नगरला काही कोणी वाली भेटला नाही. सरकार कुठलाही असो नगरमध्ये मंत्रिपद असणार म्हणजे असणारच… इतके मोठे नेते नगरमध्ये होऊन गेले परंतु नगर जिल्हा आपला आहे असं कुणाला वाटलं नाही प्रत्येक जण आपापला मतदारसंघ प्यारा होता.

परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेव्हापासून त्यांची संपत्ती किती आहे हे शपथपत्रात नमूद केले तेव्हापासून नगरचा भाव वाढला आहे ना भाऊ….
कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अहमदनगर आणि माहीममध्ये प्लॉट्स आहेत. त्यांची एकूण किंमत – 4 कोटी 20 लाख इतकी आहे. तसेच त्यावर बांधकामानंतर त्या जागेची किंमत – 13 कोटी 64 लाख इतकी आहे. आता कोटी कोटी रुपये जर मुख्यमंत्री नगरमध्ये गुंतवणूक करत असतील तर नगरचा भाव वाढणारच ना भाऊ….

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*