आरोग्य सेतू अ‍ॅपची सक्ती कशी असू शकते : सेवानिवृत्त न्यायमूर्ती

रेल्वे प्रवासासाठी आरोग्यसेतू ॲप असणे बंधनकारक :
कोणत्या कायद्याखाली ही सक्ती करत आहात?; सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्तींचा सवाल

पीटीआयने केलेल्या ट्विटनुसार ‘जर तुम्हाला रेल्वे प्रवास करायचा असेल तर आरोग्य सेतू हे ॲप इन्स्टॉल करणे बंधनकारक आहे’. तसेच सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या नोकरदारांनी हे अ‍ॅप वापरावं, असे सक्ती आदेश दिले होते. आरोग्य सेतू वापर यापूर्वी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण यांनी ‘आरोग्य सेतू’ची सक्ती संबंधित बोलताना सांगितले आहे की, “आवश्यक कायद्याचं पाठबळ असल्याशिवाय आरोग्य सेतू अ‍ॅपची सक्ती गृहित धरली जाऊ शकतं नाही. राष्ट्रीय आपत्ती कायदा आणि साथ रोग कायदा हे दोन्ही कायदे वेगळ्या कारणांसाठी आहेत.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, माहिती संरक्षण विधेयकातील तत्वाचं पालनं केलं जात आहे. ही चांगली बाब असली, तरीही माहिती लिक झाली किंवा बाहेर गेली तर जबाबदार कोण असेल? ते कुणाला सांगावं हे सांगितलेलं नाही. कोणत्या कायद्यानुसार तुम्ही आरोग्य सेतूची कुणावरही सक्ती करीत आहात? असाही सवाल त्यांनी उभा केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*