धार्मिक स्थानाच्या सोन्याबाबत पृथ्वीराज बाबा म्हणतात ‘हे’..!

मुंबई :

अभ्यासू माजी मुख्यमंत्री व राजकीय नेते म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची ओळख आहे. अर्थाचक्राला गती देण्यासाठी आणि या आपत्कालीन संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी देवस्थानांचे सोने ताब्यात घेऊन त्यावर व्याज देण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाला केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. #WorldGoldConcil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे.

देशाची गरज असताना हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई आदि सर्व धर्माच्या देवस्थानाचे सोने ताब्यात घेण्याची त्यांनी सूचना केली आहे. आता त्यावर पंतप्रधान कार्यालय काय कार्यवाही करणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*