ट्रॉली बॅगवर झोपलेल्या चिमुरडा बनलाय ‘आत्मनिर्भर’; ट्विटरवर ट्रेंडमध्ये आहे व्हिडिओ

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ जगजाहीर होत आहे. असे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रसिद्ध होत आहेत.त्यातलाच एक ट्रॉली बॅगवर झोपलेल्या आणि ‘आत्मनिर्भर’ चिमुरडा बनलेल्या एका चिमुरड्याचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ ट्रेंडमध्ये आहे.

अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. बिहारमधील संजय यादव यांनी हा व्हिडीओ टाकला आहे. त्यावर त्यांनी म्हटले आहे की, साहेब, ट्रॉली बॅगवर मुलगा झोपलाय, त्याची आई त्याला ओढत आहे. ते आपल्या ताकदीवरच घरी जात आहेत. यापेक्षा आणखी काय आत्मनिर्भर भारत पाहिजे. २० लाख कोटी ज्या कोणा पराश्रित जीवांना देणार आहात. त्यांनाच लखलाभ असू दे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून यादव यांनी हा व्हिडिओ टाकला आहे. त्यावर अनेकांनी वेदनादायी अशी प्रतिक्रिया देऊन हा व्हिडिओ शेअर केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*