महिनाभरात मेडिकलच्या ३०,००० रिक्त पदांची भरती; पहा काय म्हणाले आरोग्यमंत्री

मुंबई :

करोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत राज्यामधील आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा भरण्याची तयारी राज्य सरकात्राने केली आहे. कोणतीही परीक्षा न घेता ही भरती केली जाणार आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा वाढता कहर पाहता, राज्य सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा महिनाभरात भरण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतीही परीक्षा न घेता, पूर्वीच्या शैक्षणिक पातळीवरील परीक्षांवरुन या जागा तातडीने भरल्या जातील.

मुंबई महापालिकेने तातडीने रिक्त जागा भरण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात 17 हजार 337 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागात 11 हजार जागा रिक्त आहेत. त्या सर्व भरल्या जाणार असल्याची माहिती टोपे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*