आता ‘गुगल’वर करा फ्रीमध्ये ‘मीट’; असे वापरा हे अॅप्लिकेशन

ऑनलाईन मिटिंगसाठी सध्या सर्रास झूम हे अॅप्लिकेशन वापरण्यास सुरुवात झाल्याने आता गुगल कंपनीने मीट हे अॅप्लिकेशन मोफत केले आहे. यापूर्वी सेवाशुल्क देऊन हे अॅप्लिकेशन वापरावे लागत होते. मात्र, मार्केटची गरज लक्षात घेऊन google meet सर्वांसाठी खुले झालेले आहे.

यापूर्वी google meet वापरण्यासाठी गुगलचे बिजनेस खते किंवा एज्युकेशन खाते गरजेचे होते. मात्र, आता आपल्या सामान्य गुगल मेलवरूनही गुगल मीट वापरता येणार आहे. एकाचवेळी याद्वारे आपण १०० लोकांशी बैठक करू शकतो.

जगभरात लॉकडाऊन लागू असल्याने सध्या अनेक कंपन्या आणि संस्था ऑनलाईन मिटिंग घेत आहेत. तसेच काही सेमिनार आणि मित्रांच्या चिअर्स पार्ट्याही ऑनलाईन घेतल्या जात आहेत. अशावेळी इतर कंपन्यांचे अॅप्लिकेशन वापरण्यास सुरुवात झाल्याने गुगलने मार्केटची गरज लक्षात घेऊन ऑनलाईन मिटिंगसाठीचे हे अॅप्लिकेशन मोफत आणि सर्वांसाठी खुले करून टाकले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*