सोनालीने सांगितले कोल्हापूरच्या लग्नाचे ‘खरे गुपित’; पहा काय म्हणाली ‘अप्सरा’

पुणे :

नटरंग सिनेमा आठवतोय ना.. हा तोच तो अतुल कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी यांच्या अफलातून केमेस्ट्रीचा भन्नाट अंदाज. त्यातली अप्सरा म्हणजे सोनाली हिचे मध्ये एका कोल्हापुरातील राजकीय नेत्याशी लग्न झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, त्या फ़क़्त अफवा असून आपण कसे लग्न करणार याची स्पष्टोक्ती आता सोनालीने दिली आहे.

महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी हिचे एक राजकीय नेत्याशी लग्न झाल्याच्या अफवा मधील काळात जोरात होत्या. कोल्हापूरमधील एका बड्या राजकीय नेत्याशी तिचे लग्न झाले असल्याची बातमी होती. आता तिने त्याविषयी खुलासा करत सांगितले आहे की, क्लासमेट्स’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना माझं लग्न झालं अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. मी संपूर्ण स्टारकास्टसोबत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. कोल्हापूरच्या एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाशी माझं लग्न झालं, अशी ती बातमी होती. आम्ही सगळेजण ती बातमी वाचून हसलो, कारण त्यात तथ्य काहीच नव्हतं. अफवा समजून मी त्याकडे दुर्लक्षसुद्धा केले.

तिने म्हटले की, त्याचा खरा किस्सा असा होता की त्या राजकीय नेत्याच्या विरोधात असणाऱ्या लोकांनी ही बातमी पेरली होती. जेणेकरून त्या राजकीय नेत्याची प्रतिमा मलिन होईल. परंतु, त्यांचे हित काही साधले नाही. कारण स्वतः सोनालीने या विषयी कबुली दिली आहे. त्यानंतर तिने आपल्या खऱ्या लग्नाविषयी बोलताना सांगितले की, मला चार पद्धतीने लग्न करायची ईच्छा आहे. आई पंजाबी असल्याने पंजाबी पद्धतींनुसार, महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार, ख्रिश्चन लग्नाबद्दल विशेष आकर्षण असल्याने त्या पद्धतीनुसार आणि होणाऱ्या जोडीदाराची जी पसंत असेल त्यानुसारचे लग्न..!

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*