शिक्षण क्षेत्रासाठी केंद्राचा वेगळा निर्णय; इयत्तानिहाय स्वयंप्रभा चॅनल, ऑनलाईन शिकवणी

दिल्ली :

लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आणि नव्याने आलेले तंत्रज्ञान घरोघरी शिक्षणासाठी वापरण्याच्या हेतूने आता केंद्र सरकारने नवीन क्रांतिकारी बदलाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता प्रत्येक इयत्तेनुसार चॅनल सुरू केले जाणार आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २० लाख कोटींच्या विशेष पॅकेजबद्दलच्या पत्रकार परिषदेत म्हटले की, डीटीएचवर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळा चॅनेल तयार करणार केला जाणार आहे. सध्या असे ३ चॅनल आहेत. यामध्ये आणखी १२ चॅनलची भर पडणार आहे. विद्यार्थांकडे इंटरनेटच्या सुविधेचा अभाव असेल त्यांच्यासाठी हे फायदाचे होईल. विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोबल प्रोग्रामही यामध्ये सुरू केले जातील. तसेच दिव्यांगासाठी विशेष शिक्षा सामग्री तयार करण्यात येईल. देशातील टॉप १०० विद्यापीठांना ऑनलाइन शिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे.

त्यांनी सांगितले की, चॅनलद्वारे ई-कॉन्टेंटची निर्मिती केली जाईल. वन क्लास, वन चॅनल या योजनेद्वारे १२ वीपर्यंतच्या विद्यार्थांसाठी १२ चॅनेल तयार केले जातील. पॉडकॉस्ट, कम्युनिटी रेडिओ या माध्यमाचाही यासाठी वापर करण्यात येणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*