BSNL ग्राहकांसाठी गुड न्यूज; ही सर्विस केली अनलिमिटेड

दिल्ली :

भारतात पहिल्यांदाच ऑडिओ मेसेज सर्व्हिस ग्राहकांना दिली जाणार आहे. सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL हे आपल्या ग्राहकांसाठी ऑडिओ मेसेज सर्विस देणार आहेत. यापूर्वी भारतात अशी ऑडिओ मेसेज सर्विस सेवा कुठल्याही टेलिकॉम कंपनीने दिलेली नाही. या ऑफरचे वैशिष्ट्य म्हणजे BSNL ही ऑडिओ मेसेज सर्विस अनलिमिटेड वापरण्याची मुभा आपल्या ग्राहकांना देत आहे.

यासाठी तुम्हाला केवळ आपल्या फोनमध्ये मेसेज रेकॉर्ड करायचा आहे. व तो मेसेज आपल्याला पाहिजे त्या व्यक्तीला पाठवायचा आहे. बहुतेक पुढच्या दोन महिन्यांमध्ये बीएसएनएल ही सेवा ग्राहकांपर्यंत घेऊन येण्याची शक्यता आहे.

कंपनीकडून हे एक फीचर मोबाइल अॅपवरून बीएसएनएलच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. सर्वात आधी बीएसएनएल युजर्संना आपला मोबाइल ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करावा लागेल. त्यानंतर व्हॉईस मेसेजचा वापर करता येणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*