अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला केले होम क्वॉरंटाइन

बई :

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी होम क्वॉरंटाइन केले गेले आहे. नवाजुद्दीन हा ईदसाठी त्याच्या मूळ गावी गेला होता. तो मुंबईहून निघून उत्तरप्रदेशमध्ये असलेल्या बुढाणा शहरात पोहोचल्यावर त्याला सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार होम क्वॉरंटाइन केले गेले आहे.

यावेळी त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबियांनाही होम क्वॉरंटाइन केले आहे. मुंबईमधील कोरोनाची परिस्थिती पाहता नवाजुद्दीन सिद्दिकीला होम क्वॉरंटाइन करणे गरजेचे होते. तेथील स्थानिक पोलिस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने बुढाणा शहरातील त्याच्या घरी जाऊन त्यांना होम क्वॉरंटाइन केले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*