कोहलीवर येतोय चित्रपट; त्यात स्वतः कोहलीच करणार काम, पण एका अटीवर

विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विराट कोहलीवर आता एक सिनेमा येत आहे. आणि त्यात चक्क विराट स्वतः काम करणार असल्याचे त्याने एका इंस्टाग्राम लाईव्हवर बोलताना सांगितले. क्रिकेट नंतर विराट आता अभिनय क्षेत्रातही पाऊल टाकत आहे आणि तिथेही तो विराट कामगिरी करेल याची खात्री त्याच्या चाहत्यांना आहे.

रविवारी त्याने इंस्टाग्राम लाईव्ह मध्ये बोलताना स्वतःच्या बायोपिक मध्ये मुख्य भूमिका करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी तो भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याच्याशी इंस्टाग्राम लाईव्ह चॅट करत होता.

यावेळी छत्री याने त्याला ‘तुला स्वतःच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल का? असे विचारले असता त्याने हो असे उत्तर दिले परंतु एक अट घातली. ती अट म्हणजे त्या चित्रपटात हिरोईन म्हणून त्याची बायको आणि प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा असेल तरच मी काम करेल, असे त्याने म्हटले आहे.

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याच्याशी इंस्टाग्राम लाईव्ह चॅट करताना विराटनं हा खुलासा केला. विराट आणि छेत्री यांनी यावेळी त्यांच्या कारकिर्दीसह क्रिकेट, फुटबॉल, लहानपणीच्या आठवणी आणि बऱ्याच गोष्टींवर गप्पा मारल्या.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*