रितेश भाऊ आणि जेनेलिया वहिनीची चित्रपट महामंडळाला आर्थिक मदत

मुंबई :

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने चित्रपटसृष्टीतील मोठ्या कलाकारांना चित्रपट सृष्टीतील गरजूंना मदत करावी असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठमोळ्या रितेश भाऊ आणि जेनेलिया वहिनी यांनी तब्बल दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

जशी सगळीकडे मजुरांची परिस्थिती आहे. तसेच चित्रपट सृष्टीमध्ये असे काही लोक आहेत की, ज्यांचे पोट हातावर आहे. त्यांनी आठवडाभर काम केले तरच त्यांना पैसा मिळतो. हे काही लोक चित्रपट सृष्टीमध्ये सातत्याने कष्ट करत असतात. आता त्या लोकांची आर्थिक संकटात सापडल्यामुळे उपासमारी व्हायची वेळ आली आहे. अशावेळी आपला मराठमोळा रितेश भाऊ आणि जेनेलिया वहिनी हे त्या कलाकारांच्या, कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आले आहेत.
कलाविश्वातील अन्य सेलिब्रिटींना आर्थिक सहाय्य करण्याचं आवाहन अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने केलं आहे. दरम्यान अ.भा. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी रितेश आणि जेनेलियाचे या केलेल्या मदतीसाठी आभार मानले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*