खळखळून हसवणारा भाऊ कदम एपीसोडसाठी किती पैसे घेतो हे माहितीये का?

हसताय ना आणि हसायलाच पाहिजे असेच सतत तुम्हाला सांगणारा चला हवा येऊ द्या कार्यक्रम… कार्यक्रमात आपल्याला खळखळून, पोट धरून हसायला लावणारा भाऊ कदम…
उर्फ भालचंद्र कदम..

कुठल्याही एपिसोड हा भाऊ शिवाय पुर्ण होत नाही. एक वेळ तुम्हाला अभिनय नाही तरी चालेल, परंतु तुम्ही दिसायला गोरे असले पाहिजे, तुम्ही उंचपुरे आणि हँडसम असायला पाहिजे, अशीच मागणी असणाऱ्या चित्रपट सृष्टीत भाऊ कदम स्वतःचे वेगळेपण दाखवून दिले आहे. मराठीत असा एक कॉमेडीचा सुपरस्टार आहे. जो जाड आहे, बुटका आहे, काळा आहे, तरीही त्याचे हजारो, लाखो चाहते उभ्या महाराष्ट्रात सापडतील.

महाराष्ट्रात असे एकही घर नसेल ज्यांना भाऊ कदम माहिती नाही. सुरुवातीला काही प्रायोगिक नाटकं, नंतर फू बाई फू आणि आता चला-हवा-येऊ-द्या असा प्रवास करणारा भाऊ कदम हा गरिबीत वाढला आहे. परंतु आज या घडीला भाऊ कदम एका एपिसोडचे किती पैसे घेतो? हे तुम्हाला माहीत आहे का?

भाऊ कदम हे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या एका एपिसोड साठी तब्बल 80 हजार रुपये घेतात. आज आपल्याला ते आयुष्य हजार दिसत असले तरी त्यामागचा 80 रुपयांसाठी केलेला संघर्ष हा भाऊ कदम यांच्यासाठी मोठा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*