खुशखबर : BSNL देणार ३१ मे पर्यंत प्रत्येक कॉलवर कॅशबॅक

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेड ही सातत्याने आपल्या युजर्ससाठी नवनवीन ऑफर आणत आहे. आजही त्यांनी एक नवी ऑफर जारी केली आहे. बीएसएनएल ३१ मे पर्यंत आता प्रत्येक कॉलवर कॅश बॅक देणार आहे. बीएसएनएल कंपनीने आपल्या ६ पैसे कॅशबॅकच्या ऑफरची वैधता आता ३१ मे पर्यंत वाढवली आहे.

लॉकडाऊन ४.० च्या अखेरच्या दिवसांपर्यंत या ऑफरमध्ये वाढ केली आहे. ही ऑफर लँडलाईन कॉल साठी मागच्या वर्षीच लागू करण्यात आली होती.

जर तुम्हाला ही ऑफर ऍक्टिव्ह करायची असेल तर हे फॉलो करा :-
१) ‘ACT 6 paisa’ असे लिहून 9478053334 या नंबरवर टेक्स्ट मेसेज पाठवा.
कॅशबॅक ऑफर बीएसएनएल वायरलाइन, ब्रॉडबँड आणि फायबर टू द सब्सक्रायबर्सच्या युजर्संसाठी उपलब्ध आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*