महाराष्ट्राच्या अप्सरेचा झाला साखरपुडा; लवकरच अडकणार विवाहबंधनात

मुंबई:

नुकतच एका कार्यक्रमात महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णीने तिच्या लग्ना विषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. काल तिच्या वाढदिवसानिमित्त तिने चाहत्यांना एक जबरदस्त आणि मस्त भेट दिली आहे. काल तिचा साखरपुडा दुबईमध्ये पार पडला. आता चाहत्यांसाठी भेट मस्त होती की अजुन कशी हे मात्र चाहतेच सांगू शकतील.

तिने काल इंस्टाग्राम वर तिच्या साखरपुड्याचा फोटो शेअर केला. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तिचा साखरपुडा पार पडला. कुणाल बेनोडेकर असं त्याचं नाव असून या वर्षी दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी सोनालीनं तिच्या आयुष्यातील ‘मितवा’ कोण आहे हे सांगितलं होतं.

याशिवाय, सोनालीनं तिच्या ड्रिम वेडींगबद्दल अनेक गोष्टी एका कार्यक्रमात तिच्या चाहत्यांना सांगितल्या होत्या. सोनालीला चार वेगवेगळ्या पद्धतींनी लग्न करायचय. आई पंजाबी असल्यामुळं पंजाबी पद्धतीनं, मराठमोळ्या महाराष्ट्रीय परंपरेनुसार ,ख्रिश्चन लग्नांविषयी आकर्षण असल्यामुळं ख्रिश्चन वेडींग करायला आवडेल. तसंच जोडीदाराला आवडणाऱ्या पद्धतीनंही लग्न करायचंय.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*